Features Of Academy

1) विद्यालयाचे अँप :- विद्यालयाचे मोबाईल अँड्रॉईड अप्लिकेशन उपलब्ध . अँप मध्ये ऑनलाईन प्रवेश , फिस भरणा , परीक्षा अभ्यासक्रम , वेगवेगळ्या परीक्षांचे अभ्यासक्रमाचे ऑडिओ ट्रॅक , ऑनलाईन डेमो टेस्ट , विद्यापीठाच्या नमुना प्रश्नपत्रिका , होमवर्क , स्वरलेखन , निकाल  अशा उत्तम डिजिटल सुविधा उपलब्ध .

2)  ऑडिओ :- विद्यार्थ्यांना सरावासाठी व ऐकण्यासाठी विविध रागांचे ऑडिओ उपलब्ध .

3) पुस्तक :-  विविध परीक्षांचे अभ्यासक्रमाचे विद्यालयाचे प्रिंटेड पुस्तक उपलब्ध . तसेच ऑनलाईन क्लाससाठी pdf पुस्तक उपलब्ध .

4) टेस्ट :-  शिकवुन झालेल्या अभ्यासक्रमावर प्रत्येक महिन्यामध्ये 1 ऑनलाईन  व 1 टेस्ट  प्रात्यक्षिक स्वरूपात घेतली जाते - म्हणजेच महिन्यात दोन टेस्ट घेतल्या जातात व सर्व विद्यार्थ्यांचे मार्क्स विद्यालयाच्या व्हॅट्सअँप ग्रुप वर टाकले जातात . यामुळे विद्यार्थ्यांची खूपच चांगल्या पद्धतीने तयारी होते .

5) होमवर्क :- ऑनलाईन / ऑफलाईन क्लास ला असणाऱ्या विद्यार्थ्यांचा होमवर्क अँप वर क्लास झाल्यानंतर अपलोड केला जातो . तो अभ्यास ऑनलाईन क्लास च्या विद्यार्थ्यांनी पाठ करून व्हिडिओ द्वारे विद्यालयाच्या व्हॅट्सअँप नंबर वर पुढील क्लास च्या अगोदरच्या दिवशी रात्रीपर्यंत पाठवावा लागतो .  तसेच ऑफलाईन क्लासच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास क्लास मध्ये म्हणुन घेतला जातो . होमवर्क जर एखाद्या विद्यार्थ्याने केला नाही तर ऑनलाईन क्लास च्या विद्यार्थ्याला क्लास ला जॉइन केले जात नाही व ऑफलाईन क्लास च्या विद्यार्थ्याच्या पालकांना मेसेज द्वारे कळवले जाते . होमवर्क न केलेल्या  विद्यार्थ्यांची नावे विद्यालयाच्या व्हॅट्सअँप ग्रुप वर टाकली जातात .

6) विशेष योग्यता मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात येते व त्यांना पुढील वर्षीच्या परीक्षेच्या फिस मध्ये 5 टक्के सुट पण देण्यात येते . ( 13000/- पर्यंत च्या फिस वर 5 टक्के सुट दिली जाते . 13000/- रकमेच्या पुढील फिस वर सुट दिली जात नाही ) 

7) स्पर्धा मार्गदर्शन :-  विविध स्पर्धेचे मार्गदर्शन केले जाते . विविध राज्यस्तरीय , जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत , तसेच कलर्स मराठीवरील सुर नवा ध्यास नवा कार्यक्रमाच्या ऑडीशन मध्ये विद्यालयातील विद्यार्थीनीं सहभागी झालेल्या आहेत  .

8) सहल - विद्यालयांतर्गत सहलीचे आयोजन केले जाते .

9) व्हाट्सअँप ग्रुप - विद्यालयाच्या व्हाट्सअँप ग्रुप वर विद्यार्थ्यांचे सर्व अपडेट पालकांना पाठवले जातात .

No comments:

Post a Comment