Thursday 11 May 2023

प्रथमेश ला मिळाली थेट रेडिओ स्टेशनवर गाण्याची संधी

 10 मे 2023 - ही तारीख नादब्रम्ह संगीत विद्यालयाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीली गेली , ते यासाठी , आपल्या विद्यालयातील प्रथमेश तायडे या विद्यार्थ्याला 90.8 welcome FM, आवाज बुलढाण्याचा या रेडिओ स्टेशन वर गाण्याची सुवर्ण संधी मिळाली , यामध्ये प्रथमेश ने अभंग , राजं आलं , प्रार्थना , भुप रागाची बंदिश असे गीत प्रकार गायले. काही दिवसात प्रथमेश चे हे गाणे रेडिओ वर प्रसारित होणार आहे . आपल्या विद्यालयाचे लौकिक वाढवणारी ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रथमेश ची जिद्द,चिकाटी, रियाज, तत्परता व पालकांचा सपोर्ट या सगळ्या मुळे शक्य झाले आहे .प्रथमेश गेल्या दोन वर्षपासून ऑनलाईन पद्धतीने  बुलढाण्यातून संगीताचे शिक्षण घेत आहे . प्रथमेश चे व प्रथमेश च्या पालकांचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐 व पुढील सांगीतिक वाटचालीसाठी शुभेच्छा , प्रथमेश ला ही संधी उपलब्ध करून देणारे  रेडिओ स्टेशनचे डायरेक्टर श्री .आर. जे. नरेंद्र सर व श्री.राजेंद्र वैराळकर सर , या दोघांचेही विद्यालयाच्या वतीने खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻 👍🏻. येत्या काही दिवसात ही मुलाखत रेडिओ स्टेशनवर प्रसारित होणार आहे . 






No comments:

Post a Comment